पुणे: लक्झरी बसला अपघात; ९ जखमी

 बसमधील सर्व जखमी प्रवासी भोपाळचे असल्याचे समजते. 

Updated: Jun 3, 2018, 02:12 PM IST
पुणे: लक्झरी बसला अपघात; ९ जखमी title=

पुणे: लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी (रविवार, ३ जून) घडली. सासवडहून पुण्याच्या दिशेने याणाऱ्या या बसला अपघात घडल्यानंतर पुण्याकडे येणारी वाहतूक बराच विस्कळीत झाली होती.

बोपदेव घाटाजवळ  अपघात

प्राप्त माहितीनुसार, सासवडहून पुण्याच्या दिशेने येताना बोपदेव घाटाजवळ या बसला अपघात घडला. चालत्या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे लक्झरीवरील नियंत्रण सूटले आणि बस उलटली. यात नऊ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्व जखमी प्रवाशांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सर्व जखमी प्रवासी भोपाळचे

दरम्यान, बसमधील सर्व जखमी प्रवासी भोपाळचे असल्याचे समजते. अपघातानंतर जेसीबीच्या मदतीने रस्त्यालगतची माती दूर करून बस दूर करण्यात आली. त्यानंतर वाहतूक हळूहळू पुर्ववत झाली.