सुजय विखे पाटलांचा भाजपा प्रवेश निश्चित

 सुजय विखे पाटलांचा भाजपा प्रवेश निश्चित असल्याचे भाजपा पदाधिकारी सांगत आहेत. 

Updated: Mar 11, 2019, 08:24 PM IST
सुजय विखे पाटलांचा भाजपा प्रवेश निश्चित  title=

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कितीही मोठ्या घडामोडी घडत असल्या तरीही सुजय विखे पाटलांचा भाजपा प्रवेश निश्चित असल्याचे भाजपा पदाधिकारी सांगत आहेत. उद्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा भाजप प्रवेश होईल असेल असेही ते सांगत आहेत. सुजय विखे पाटील कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या मार्गावर असताना आता राधाकृष्ण विखेंना रोखण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. सोनीया गांधींनंतर आता अशोक चव्हाणांशी राधाकृष्ण विखेंची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सुजय विखे पाटलांचा भाजपा प्रवेश निश्चित असल्याचे वृत्त 'झी 24 तास'ने याआधी दिले आहे.

सुजय विखे-पाटलांचा भाजपप्रवेश काँग्रेसकडून रोखला जाणार? दिल्लीत बैठक सुरू

सुजय विखेंचा भाजपा प्रवेश थांबवण्याचे कॉंग्रसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण हे प्रयत्न निष्फळ असल्याचे भाजपाचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या गोटातूनही याला संमती देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. या सर्वात आता राधाकृष्ण विखेंच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

सुजय विखे पाटलांना अहमदनगर दक्षिणमधून भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील मात्र काँग्रेस सोडणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्यात राधाकृष्ण विखे पाटलांची सर्वात मोठी अडचण होणार आहे. गेले काही दिवस सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचीही चर्चा होती... मात्र सुजयला राष्ट्रवादीत घेऊन तिकीट देण्याऐवजी काँग्रेसला नगरची जागा सोडावी, असा काँग्रेसचा आग्रह होता. अखेर सुजय विखे पाटील भाजपावासी होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच पळवून भाजपाने काँग्रेसला मोठा दणका दिला आहे.