Sharad Pawar on Chandrababu Naidu : देशातील लोकसभा निवडणुकीच्या कल जाहीर होत असताना भाजपला धक्का बसताना दिसत आहे. इंडिया आघाडीच्या यशावर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे. तर बारामतीचा निकाल अपेक्षित होता, असा विश्वास त्यांनी लेकीबद्दल व्यक्त केला. तर चंद्राबाबूंशी बोललो यामध्ये काही तथ्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सत्ता स्थापनेबद्दल सध्या फक्त आणि येच्युरींशी बोललो.
देशातील लोकसभा निवडणुकीच्या कल जाहीर होत असताना भाजपला धक्का बसताना दिसत आहे. इंडिया आघाडीच्या यशावर शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. हा निकाल म्हणजे परिवर्तनाला पोषक असा आहे, असं त्यांनी म्हटलं. भाजपला याआधी उत्तर प्रदेशात मोठा निकाल मिळालेला, तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थानात वेगळा निकाल पाहिला मिळाला.
उत्तर प्रदेशच्या जनतेनं वेगळा निकाल दिला. यापूर्वी उत्तर प्रदेश आणि या भागात जे यश मिळायचं ते फार मोठं असायचं आता मिळालेला विजय कमी मताधिक्याने मिळाला आहे. याचा अर्थ आम्ही राष्ट्रीय पातळीवर जे काम करतो त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद आहे. या निकालानंतर मी खरगे आणि इतर अन्य लोकांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे. उद्याच्या बैठकीत पुढचे धोरण आणि पुढची निती सामुहिकपणाने चर्चा करु सांगू.
या निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली मर्यादीत जागा लढवल्या. त्यापैकी आम्ही 7 जागेंवर आज आम्ही पुढे आहोत. 10 जागा लढून 7 विजय म्हणजे आमचा स्ट्रायकिंग रेट उत्तम आहे. हे यश मिळालं आहे. हे यश एकट्या राष्ट्रवादीचं यश आहे असं आम्ही मानत नाही. हे आघाडीचं यश आहे. काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्रित काम केलं. त्यामुळे हे यश आमच्याप्रमाणे काँग्रेसलाही मिळालं. हेच यश उद्धव ठाकरेंना मिळालं. परिवर्तनाचं वातावरण आहे. आम्ही तिघेही एकत्रित राहू. उद्याच्या काळात आमची धोरणं ठरवून महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेण्याची खबरदारी घेऊ. उद्याची बैठक संध्याकाळी ठरेल. त्यात माझी उपस्थिती असेल.
नितीश कुमार यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही. त्याची माहिती नसताना मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. याहून वेगळा निकाल लागेल असं मला वाटलं नव्हतं. बारामती हा गेल्या 60 वर्षांपासून मी मतदारसंघातून लढतोय. माझी सुरुवात तिथे झाली. तिथल्या मतदाराचे मूलभूत प्रश्न मी ओळखतो. ते योग्य निर्णय घेतात.
हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे. तर बारामतीचा निकाल अपेक्षित होता, असा विश्वास त्यांनी लेकीबद्दल व्यक्त केला. तर चंद्राबाबूंशी बोललो यामध्ये काही तथ्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सत्ता स्थापनेबद्दल सध्या फक्त खरगे आणि येच्युरींशी बोलणं झालंय. मध्य प्रदेशात अजून काम करण्याची गरज असल्याच ते यावेळी म्हणाले. हा निकाल महाराष्ट्रातील लोकांनी विचारपूर्वक दिलेला आहे.