Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, दुसरीकडे कल समोर येत आहेत. दरम्यान कलांमधून जे चित्र दिसत आहे त्याचा शेअर बाजारावर मोठा परिमाण झाला आहे. शेअर बाजारात सुरुवातीला झालेली घसरण नंतर त्सुनामीत बदलली. ही बातमी लिहिली जात होती तेव्हा सेन्सेक्स 4000 अंकांनी कोसळला होता. तर निफ्टी 1233 अंकांनी घसरला होता. 12 वाजता सेन्सेक्स तब्बल सेन्सेक्स 5000 अंकांनी कोसळला होता.
शेअर बाजारात मंगळवारी शेअर बाजार कोसळल्यानंतर ही घसरण सुरुच आहे. शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला होता. यानंतर दुपारी 12.30 वादजता 6094 अंकांनी घसरुन 70 हजार 374 वर पोहोचला. दुसरीकडे निफ्टी 1947 अंकांनी घसरुन 21 हजार 316 वर ट्रेड करत होता.
सोमवारी शेअर मार्केट सेन्सेक्समध्ये 2500 अंक आणि निफ्टीत 733 अंकांची वाढ होऊन बंद झालं होतं. पण आज त्याच्या दुप्पट वेगाने दोन्हीकडे घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणुकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. BSE Mcap नुसार गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी बुडाले आहेत.
शेअर मार्केटमध्ये आलेल्या या त्सुनामीदरम्यान BSE च्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. यादरम्यान एनटीपीसी शेअर 19.68 टक्क्यांनी घसरु 314 रुपयांवर ट्रेड करत आहे. याशिवाय एसबीआय शेअरमध्ये 16.76 टक्के, पॉवरग्रीड शेअरमध्ये 5.74 टक्के, टाटा स्टील 9.99 टक्के, टाटा मोटर्स 9.96, भारती एअरटेल 9.84, रिलायन्स 9.67 आणि एचडीएफसी बँकेचे शेअर 6.18 टक्क्यांनी घसरुन ट्रेड करत आहेत.
भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी वाढ झाली होती. पण मंगळवारी हे शेअर्सदेखील कोसळले. दुपारी 12 वाजेपर्यंत अदानी पोर्ट्स 23%, अदानी एंटरप्रायझेस 20%, अंबुजा सिमेंट 20%, एनडीटीव्ही 20%, अदानी पॉवर 18%, अदानी ग्रीन एनर्जी एनर्जी 18% च्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.