मुंबई / नागपूर / पुणे : लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला तो परप्रांतीय मजुरांना. राज्यात व्यवसाय आणि मजुरी करण्यासाठी आलेल्यांचा परतीचा प्रवास दररोज सुरु आहे. मात्र, अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरुन शेकडो ट्रक जात असून अत्यंत जीवघेणा प्रवास जनावरांनापेक्षा कोंबून मजूर धोकादायक आणि जीवघेणा प्रवास करीत आहे.
असा प्रवास सध्या सुरु आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये परप्रांतीय मजुरांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या या शेकडो परप्रांतीय मजुरांनी आपल्या राज्यात परतण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर तोबा गर्दी केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवत या मजुरांनी ट्रकच्या माध्यमातून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. एवढचं नाही तर काही मजूर थेट रिक्षामार्गे आपल्या गावी निघाले आहेत. यामुळे नाशिकचा मुंबई-आग्रा महामार्ग हा गर्दीने आणि वाहतुकीने ट्रॅफिक जाम होऊ लागला आहे.
एकेका ट्रक मध्ये जवळपास ६० ते ८०जण प्रवास करीत आहे. अमरावतीचा पारा हा 44 अंशावर गेला आहे.त्यामुळे भर उन्हात ट्रकवर बसून तळपत्या उन्हात बसून हे लोक प्रवास करीत आहे. लॉकडॉऊनमुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून या कामगारांचा परतीचा संघर्षमय प्रवास अद्यापही सुरूच आहे.
पुणे जिल्ह्याच्या विविध भागात अडकलेले कामगार हे शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत आपल्या चिमुकल्यांना घेऊन भर उन्हात पायी प्रवास करत पुणे नगर महामार्गावरून आपल्या राज्यात चालले आहेत.