Loksabha Elections 2024 Live Updates : बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. एनडीए 292 जागा, इंडिया आघाडी 234 विजय मिळाला आहे. 17 जागांवर इतर पक्षांचा उमेदवारांचा विजय झाला आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळालाय. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरुवात झाली असून आज दिल्लीत बैठकीचं सत्र असणार आहेत. अनेक दिग्गज नेते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
5 Jun 2024, 09:17 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : NDAच्या दोन घटकपक्षांची दमदार कामगिरी
NDAच्या दोन घटकपक्षांची कामगिरी दमदार झालीय...आंध्र प्रदेशमध्ये TDP आणि बिहारमध्ये नितीश कुमारांना चांगलं यश मिळालंय...बिहारमध्ये जेडीयूने 16 जागा लढवल्या होत्या...आणि त्यातील 15 जागांवर विजय मिळवलाय...तर टीडीपीने 16 जागा जिंकल्यायत...यासोबतच आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत टीडीपीने 175 विधानसभा जागांपैकी 135 जागा जिंकल्यायत...त्यामुळे टीडीपी आणि जेडीयूच्या विजयाने राष्ट्रीय स्तरावर त्यांचं महत्त्व वाढवलंय...
5 Jun 2024, 09:12 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : दिल्लीत इंडिया आघाडीकडून 28 पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण
आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडेल. इंडिया आघाडीनं सर्वच्या सर्व 28 पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण दिलंय. उद्धव ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहणारेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील बैठकीसाठी उपस्थित राहणारेत. यामुळं सरकार कुणाचं येणार? सत्ता परिवर्तन होणार की नेतृत्वबदल होणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
5 Jun 2024, 09:11 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग, दिल्लीत बैठकींचे सत्र
लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झालेत.एकट्या भाजपनं बहुमत मिळवलेलं नसून त्यांना सत्तास्थापनेसाठी एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणारेय. अशातच इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्यात. त्यामुळे इंडिया आघाडीदेखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकते. इंडिया आघाडीतील नेत्यांनीही अशा प्रकारचे संकेत दिलेत.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4