Loksabha Elections 2024 Live Updates : बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. एनडीए 292 जागा, इंडिया आघाडी 234 विजय मिळाला आहे. 17 जागांवर इतर पक्षांचा उमेदवारांचा विजय झाला आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळालाय. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरुवात झाली असून आज दिल्लीत बैठकीचं सत्र असणार आहेत. अनेक दिग्गज नेते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
5 Jun 2024, 17:53 वाजता
फडणवीसांना जनतेनेच मुक्त केलं, फडणवीसांना आता कोणतंही काम राहिलेलं नाही - संजय राऊत
5 Jun 2024, 16:21 वाजता
नितीश कुमार, चंद्राबाबूंचं एनडीएला समर्थन, एनडीए करणार सत्तास्थापनेचा दावा - सूत्र
5 Jun 2024, 15:34 वाजता
एका निवडणुकीने सगळं काही संपत नसतं - एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
"हे जे यश-अपयश आहे ते सामूहिक जबाबादारी आहे असं समजतो. आम्ही टीम म्हणून काम केलंय. राज्यात मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा आम्ही एकत्र काम केलंय. यापुढे देखील एकत्र काम करायचं आहे. त्यामुळं ही सामूहिक जबाबदारी आहे. एका निवडणुकीने सगळं काही संपत नसतं. एका निवडणुकीमुळं हार-जीत आम्ही खचून जाणारे नाही. त्यांनी काही भावना व्यक्त केल्या असतील पण आम्ही टीम म्हणून काम करत राहणार आहोत - एकनाथ शिंदे
5 Jun 2024, 15:27 वाजता
भाजप नेत्यांच्या फडणवीसांची चर्चा, फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणार, देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्षासाठी काम करावं - चंद्रशेखर बावनकुळे
5 Jun 2024, 15:27 वाजता
देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली तर तो मोठा धक्का असेल - सुषमा अंधारे
अत्यंत वाईट प्रदर्शन झाल्याने कारवाई होऊ शकते. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होऊ शकते, प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं यावरही चर्चा झाली असावी. हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली तर तो मोठा धक्का असेल. त्यापूर्वी त्यांना आदरपूर्वकपणे बाहेर जाण्याची परवानगी मागावी या आशेने त्यांनी ही मागणी केली असावी - सुषमा अंधारे
5 Jun 2024, 15:24 वाजता
आमच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही, त्यांनी या पत्रकार परिषदेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी केंद्राशी चर्चा करुन निर्णय घेणार असेही सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही - चंद्रशेखर बावनकुळे
5 Jun 2024, 15:14 वाजता
जनतेनी भाजपाला त्यांची जागा दाखवली - नाना पटोले
"भाजपाला वाटत होत आम्हीच राजे आहोत. जनतेनी भाजपला नाकारलं आहे. फडणवीस यांना राजीनामा द्यावा किंवा नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण जनतेनी भाजपाला त्यांची जागा दाखवली आहे" - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया
5 Jun 2024, 15:02 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : देवेंद्र फडणवीसांकडून राजीनाम्याचे संकेत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय... लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी ही माझी असल्याचं त्यांनी मान्य केलं. मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्त्वाकडे करणार आहे...विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीनं पक्षासाठी संपूर्ण वेळ देणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
अधिक सविस्तर वाचा - 'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत
5 Jun 2024, 14:19 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : 'इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बनणार'
दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बनणार असून सरकार बनवण्यासाठी फॉर्म्युला तयार, असा दावा नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलाय.
5 Jun 2024, 14:11 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : नितीश कुमार NDAच्या बैठकीत सहभागी होणार
सत्ता स्थापनेसाठी हालचालीला वेग आला असून नितीश कुमार NDAच्या बैठकीत सहभागी होणार, अशी माहिती समोर आलीय. बैठकीत जेडीयू पाठिंब्याचं पत्र एनडीएला देणार, अशी माहिती जेडीयूचे प्रवक्ते के सी त्यागी यांनी दिली आहे. NDAची बैठक आज संध्याकाळी दिल्लीत होणार आहे.