Loksabha Elections 2024 Live : तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन

Loksabha Elections 2024 Live : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अब की बार 400 पार असा पंतप्रधान मोदी आणि भाजपचा नारा फोल ठरला. भाजपने बहुमताला हुलकावली दिली. एनडीए 292 जागा, इंडिया आघाडी 234 जागा मिळाल्या आहेत म्हणून आता सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरु झालीय. 

Loksabha Elections 2024 Live : तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन

Loksabha Elections 2024 Live Updates : बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. एनडीए 292 जागा, इंडिया आघाडी 234 विजय मिळाला आहे. 17 जागांवर इतर पक्षांचा उमेदवारांचा विजय झाला आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळालाय. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरुवात झाली असून आज दिल्लीत बैठकीचं सत्र असणार आहेत. अनेक दिग्गज नेते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. 

5 Jun 2024, 10:57 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates : 'मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी'

मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना साथ देण्याची तयारी एमआयएमच्या ओवैसी यांनी दर्शविली. लोकसभा निवडणूक निकालानंतरचं ओवैसीचं हे मोठं वक्तव्य असून आता नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. 

5 Jun 2024, 10:11 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates :  फडणवीस निकालावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे...लोकसभा निकालावर फडणवीस बोलण्याची शक्यता आहे...यावेळी महाराष्ट्रात भाजपला हवं तसं यश मिळालेलं नाहीये...फक्त 9 जागांवरच भाजपचा विजय झालाय...त्यामुळे फडणवीस या निकालावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...

 

5 Jun 2024, 10:08 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates :  जॉर्जिया मेलोनीकडून मोदींचं अभिनंदन

भाजपाच्या या विजयावर पंतप्रधान मोदींनी 'गुड फ्रेंड' म्हणणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अभिनंदन केलंय. 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - 'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

 

5 Jun 2024, 10:06 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates :  दिल्लीतील बैठकीसाठी अजित पवार जाणार?

लोकसभा निकालानंतर आज दिल्लीत एनडीएची सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाची बैठक होणारेय. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता आहे. अजित पवार गटाकडून पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत.

 

5 Jun 2024, 10:03 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates :  'शेवटपर्यंत त्रास द्यायचं काम विरोधकांनी केलं'

बीडमध्ये शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव केलाय...माझा विजय होणार होता म्हणून मी संयमाने होतो...मात्र, शेवटपर्यंत त्रास द्यायचं काम विरोधकांनी केलं...बीडची जनता सोबत असल्यामुळे विजय झाल्याची प्रतिक्रिया सोनावणे दिलीय...आता बीडचं राजकारण आम्हाला विचारल्याशिवाय यापुढे होणार नाही...असं म्हणत बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना आव्हान दिलंय...

5 Jun 2024, 10:01 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates :  'विजयासाठी भाजपच्या स्टेजवरील नेत्यांनी मदत केली'

दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा विजय झालाय. त्यांनी भाजपच्या सुजय विखे पाटलांचा 29 हजार मतांनी पराभव केलाय. विजयानंतर बोलताना त्यांनी भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणा-या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं म्हटलंय.

5 Jun 2024, 09:37 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates : उत्तर पश्चिम मुंबई निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे अखेरच्या निकालात आघाडीवर असताना फेर मतमोजणी घेण्यात आली आणि यामध्ये कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला...या निकालामध्ये गडबड झाल्याचा शिवसेना ठाकरे गटाला संशय आहे, त्यामुळे या निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असून पक्षाकडून यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे...या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती मिळतेय...

5 Jun 2024, 09:33 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates :  एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार घडामोडी

एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार घडामोडी वेग आला आहे. सत्ता स्थापनेच्या दिल्लीत मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्लीतील बैठकीसाठी दोन्ही नेते नितीश कुमार, तेजस्वी यादव एकाच विमानानं दिल्लीला जाणार आहेत. 
 

5 Jun 2024, 09:21 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates :  मोदी सरकारची आज शेवटची कॅबिनेट बैठक

मोदी सरकारची आज शेवटची कॅबिनेट बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस होणार आहे. त्यानंतर नव्या सरकारचा मार्ग मोकळा होणार. त्यानंतर सरकारच्या कामकाजाचाही प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. 

5 Jun 2024, 09:19 वाजता

Loksabha Elections 2024 Live Updates : नितीन गडकरी दिल्लीला जाणार 

नागपूरमधून नितीन गडकरी निवडून आल्यानंतर आज ते दिल्लीला जाणारेत. गडकरींनी लोकसभा निवडणुकीतील विजयाची मालिका अखंड राखलीय.