Loksabha Elections 2024 Live Updates : बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. एनडीए 292 जागा, इंडिया आघाडी 234 विजय मिळाला आहे. 17 जागांवर इतर पक्षांचा उमेदवारांचा विजय झाला आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळालाय. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरुवात झाली असून आज दिल्लीत बैठकीचं सत्र असणार आहेत. अनेक दिग्गज नेते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
5 Jun 2024, 14:09 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : टीडीपीने एनडीएवर दबावतंत्राचा वापर - सूत्र
टीडीपीने एनडीएवर दबावतंत्राचा वापर करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी हा दबावतंत्र वापरला जातोय...लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, कृषी, रस्ता वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार खातं मागण्याची शक्यता आहे...जवळपास 5 ते 6 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...टीडीपीला 16 जागा मिळाल्यायत...त्यामुळे केंद्रात मोदींना पुन्हा सरकार बनवण्यासाठी टीडीपीला महत्त्व आलंय...
5 Jun 2024, 13:57 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : राष्ट्रपतींना सरकार स्थापनेसाठी समर्थन पत्र सुपूर्द करणार - सूत्र
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक आज होणार आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी समर्थन पत्र सुपूर्द करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मात्र राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच लोकसभा विसर्जित होऊ शकते. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने 17वी लोकसभा विसर्जित केली जाणार आहे.
बातमी सविस्तर वाचा - नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, 'या' तारखेला करणार सत्ता स्थापनेचा दावा
5 Jun 2024, 13:08 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : मुहूर्त ठरला! 'या' तारखेला मोदी सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी?
आताची सर्वात मोठी बातमी आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरु असताना मोदी सरकाने आपली रणनिती आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 8 जूनला मोदी सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
5 Jun 2024, 13:03 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : मोदींना तिसऱ्यांदा PM करण्यासाठी गडकरींना सोडावं लागणार मंत्रिपद?
एनडीएमधील घटकपक्ष असेलल्या टीडीपी आणि जेडीयू या दोन घटकपक्षांवर सत्तास्थापनेचं सारं गणित अवलंबून आहे. असं असतानाच आता अचानक या दोन्ही पक्षांचं महत्त्व फारच वाढलं आहे.
सविस्तर वाचा - मोठी बातमी! मोदींना तिसऱ्यांदा PM करण्यासाठी गडकरींना सोडावं लागणार मंत्रिपद?
5 Jun 2024, 12:25 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : सत्ता स्थापनेसाठी चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारशी बोलणार का? शरद पवार म्हणाले की...
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडीला वेग आला आहे. दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ते म्हणाले की, सत्ता स्थापनेसाठी आजच्या बैठकीत रणनिती ठरणार आहे. तर एका पत्रकाराने विचारलं की, तुम्ही चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारशी बोलणार का? त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतर गोष्टी घडतील. संख्याबळ ठरवून सत्ता स्थापनेचा निर्णय होईल. त्यात आज ही इंडिया आघाडीची पहिलीच बैठक आहे. त्यामुळे आता काही स्पष्ट सांगता येणार नाही. सत्ता स्थापनाबद्दल ते म्हणाली की, 'हे माझ्या एकट्याच मत नसून हे ते सर्व नेते मिळून त्याबद्दल निर्णय घेतील.'
5 Jun 2024, 11:34 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : दिल्लीत अखिलेश यादव चंद्राबाबू नायडू यांची भेट होण्याची शक्यता
दिल्लीत अखिलेश यादव चंद्राबाबू नायडू यांची भेट होण्याची शक्यता आहे...इंडिया आघाडीकडून नायडूंशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर दिलीये...तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यताये...
5 Jun 2024, 11:33 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : दिल्लीच्या राजकारणात मुंडे-महाजन कुटुंबातील कुणीही नाही!
गेल्या 15 वर्षानंतर दिल्लीतील राजकारणातून मुंडे-महाजन कुटुंबातलं कुणीच नाहीये...प्रीतम मुंडेंना उमेदवारी नाकारून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली...मात्र, बीडमध्ये शरद पवार गटाच्या शरद सोनावणेंनी पंकजांचा पराभव केला...त्यामुळे दिल्लीत जाणा-या पंकजांना सोनावणेंनी रोखलं...तर दुसरीकडे मुंबईतून पूनम महाजन यांचं तिकीट भाजपने कापलं...त्यामुळे आता भाजपला सुरूवातीच्या काळात उभारी देणा-या मुंडे-महाजन कुटुंबातील कुणीही सदस्य दिल्लीच्या राजकारणात नाहीये...
5 Jun 2024, 11:31 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल
आज दिल्लीत होणा-या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल झालेत.. उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडेल. इंडिया आघाडीनं सर्वच्या सर्व 28 पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलंय.. सत्तास्थापनेसाठी एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणारेय... अशातच इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्यात. त्यामुळे इंडिया आघाडीदेखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकते. त्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलीये.
5 Jun 2024, 11:31 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : DA सरकार स्थापनेपूर्वी राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?
दिल्लीत आज एनडीएची बैठक होत असतानाच विरोधी पक्ष इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडणारेय. एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल होणारेत. तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत. विशेष म्हणजे दिल्लीसाठी हे दोन्ही नेते एकाच विमानानं रवाना झालेत. त्यामुळे आता NDA सरकार स्थापनेपूर्वी राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का याकडे लक्ष असेल.
5 Jun 2024, 11:15 वाजता
Loksabha Elections 2024 Live Updates : भाजपच्या पराभवाची 10 कारणे
10 वर्षांच्या अँटी इनकम्बन्सीचा फटका
400 पारचा नारा ठरला बूमरँग
संविधान बदलणार, विरोधकांचा आरोप
मुस्लीम, दलित मते एकवटली
भारत जोडो यात्रांमुळं विरोधी वातावरण
यूपीत सपा-काँग्रेस युती भाजपला वरचढ
फोडाफोडीचं राजकारण अंगलट आलं
शेतकरी आंदोलन, महागाईचा फटका
अग्निपथ योजनेवरून सरकारवर नाराजी
राममंदिराचा फायदा झाला नाही