पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने  हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2017, 07:52 PM IST
पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला title=

अहमदनगर : पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने  हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमालामधले कवडे कुटुंबीय पाणी भरण्यासाठी गेले होते. पाणी भरुन झाल्यावर घरी परतत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्यानं अचानक शारदा कवडेंवर हल्ला केला. 

अचानक झालेल्या हल्ल्यानं शारदा कवाडेंनी मोठ्यानं आरडाओरड केली. मात्र, प्रसंगवधान पाहून तिच्या पतीनं हतातील खोरे उगारुन बिबट्याच्या तावडीतून आपल्या पत्नीला वाचवलं.

जखमी शारदांवर सुरुवातीला शासकीय आणि नंतर खासगी रुग्णालयत उपचार करण्यात आलंय. या घटनेची माहीती वन विभागाला कळल्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल अखाडे,पंचनामा केल्या मात्र या घटनेनं गावकरी आणखी भयभीत झालीय.