वकील सतीश उके यांची रात्र नागपूर विमानतळावर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्या बाजूने लढणारे वकील सतीश उके यांच्या घरी काल ईडीने छापा मारला. 

Updated: Apr 1, 2022, 10:28 AM IST
वकील सतीश उके यांची रात्र नागपूर विमानतळावर title=

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्या बाजूने लढणारे वकील सतीश उके यांच्या घरी काल ईडीने छापा मारला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत सुमारे दोन तास चौकशी केली. 

ईडीने पहाटे पाच वाजता वकील सतीश उके याच्या घरी छापा मारला. दोन तासाच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांचे बंधू प्रदीप उके यांनाही ताब्यात घेण्यात आले. या दोघानांही घेऊन ईडीचे अधिकारी मुंबईला निघाले. पण..

वकील सतीश उके आणि प्रदीप उके यांना घेऊन ईडीचे अधिकारी नागपूर विमानतळावर आले. या दोघा बंधूना रात्री 11.20 च्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार होते. मात्र, त्यांना रात्रभर नागपूर विमानतळावरच बसवून ठेवण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी वकील सतीश उके यांची घरी दोन तास चौकशी केली. त्यांच्याकडून लॅपटॉप आणि काही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली. मात्र त्यानंतर त्यांना थेट मुंबईत न आणता नागपूर विमानतळ येथे रात्रभर बसवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर उके बंधूना सकाळच्या विमानाने मुंबईत नेण्यात आल्याचे या सूत्रांनी सांगितले.