लातूरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; 73 वर्षीय वद्धाला अटक

Latur Crime : देशात रोज गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना समोर येत असतानाच महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून 73 वर्षीय नराधामाने एका चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 12, 2023, 02:15 PM IST
लातूरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; 73 वर्षीय वद्धाला अटक title=

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. यामध्ये अल्पवयीन मुला मुलींवरील अत्याचाराच्याही घटना वाढलेल्या दिसत आहेत. अशातच लातूरमधून (Latur Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्धाने पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Latur Police) नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

रविवारी 73 वर्षीय वृद्धाने पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लातूरच्या औसा तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्यात वृद्धा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

औसा तालुक्यातील किनी नवरी गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका वृद्धाने पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी हा प्रकार पाहिल्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

"आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीच्या वडिलांनी हा प्रकार पाहून पोलीस ठाण्यात येऊन तात्काळ तक्रार दिली आहे. योग्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे," अशी माहिती किल्लारी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राजपूत यांनी दिली.

मुंबईत वसतिगृहातील विद्यार्थिनीची हत्या

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात 18 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. वसतीगृहातील खोलीत तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला होता. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसतिगृहातील सुरक्षा रक्षकानेच पीडितेवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोपीने या कृत्यानंतर चर्नी रोड स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x