कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा

लव्ह जिहादची प्रकरणे अनेकदा समोर येतात. या प्रकरणांवर तीव्र विरोध व्यक्त केला जातो तर काही ठिकाणी यावर आक्षेप ही घेतला जातो. 

Updated: Nov 3, 2022, 04:51 PM IST
कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा title=
Kolhapur was a trailer dont make it show the real picture warns Nitesh Rane nz

प्रातप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : लव्ह जिहादची प्रकरणे अनेकदा समोर येतात. या प्रकरणांवर तीव्र विरोध व्यक्त केला जातो तर काही ठिकाणी यावर आक्षेप ही घेतला जातो. अशी अनेक प्रकरणं समोर येतात. त्यातलंच एक कोल्हापूरमधील प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये शाळकरी मुलीला पळवून नेण्यचे काम एक मुस्लिम युवकानं केले आहे. (Kolhapur was a trailer dont make it show the real picture warns Nitesh Rane nz)

हे ही वाचा - भारत-बांगलादेश सामना आणि बिर्याणी, तंदूरीची पार्टी, सरकारी कार्यालयात रंगली पार्टी

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

कोल्हापूर शहरात एका मुस्लिम युवकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा संशय व्सक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांजवळ मुलाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आम्हाला न्याय द्या, अन्यथा राज्यभरात सर्वत्र आंदोलन करू, असा इशाराही मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटनेला १६ दिवस उलटले आहेत. 

हे ही वाचा - Andheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू

या प्रकरणातील शाळकरी मुलगी जर परत आली नाही तर तांडव करू,असा इशारा नितेश राणे यांनी दिला. तसंच येत्या विधीमंडळ अधिवेशनात धर्मांतर बंदीचा कायदाही सरकार आणणार असल्याची माहिती नितेश राणेंनी दिली आहे.

या प्रकरणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया 

कोल्हापूर लव्ह जिहाद मधील मुलगी तब्बल 18 दिवसांनंतर सापडल्यानंतर आमदार नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.काल नितेश राणेंनी कोल्हापूर मध्ये हिंदू संघटनांचा मोर्चा काढला होता. त्यांनंतर काही तासातच ती मुलगी आणि मुलगा संकेश्वर येथे सापडले. यावर बोलताना राणे म्हणाले की, हिंदू समाजाने काल जो आवाज उठवला, तांडव होईल असा संदेश दिल्यानंतर काही तासातच ती मुलगी सापडली. यावेळी नितेश राणे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप नोंदवला. आता उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीचे सरकार नसून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा इशारा ही दिला. तसेच पुन्हा अशा घटना घडल्या तर कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

हे ही वाचा - 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी अशा पद्धतींनी केले लग्न...वाचून तुम्ही चक्रवाल

कथित लव जिहाद प्रकरणातील संशयित न्यायालयात हजर

कथित लव जिहाद प्रकरणातील संशयित आरोपी न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. संशयिता विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हा तरुण अठरा दिवसांपासून एका अल्पवयीन मुलीला घेऊन बेपत्ता होता.  तरुण मुस्लिम समाजाचा असल्याने लव जिहाद झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा संशय होता.  हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन काल जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर झाले होते. संशयिताला मुलीसह कर्नाटकातून ताब्यात घेतले.