लहान मुलांना जीवनदान देणाऱ्या लसीमुळं चिमुरड्याचा बळी, पाहा नेमकं काय घडलं...

जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. 

Updated: Nov 3, 2022, 03:27 PM IST
लहान मुलांना जीवनदान देणाऱ्या लसीमुळं चिमुरड्याचा बळी, पाहा नेमकं काय घडलं... title=

नीतेश महाजन, झी मीडिया, जालना: सध्या अनेक ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहे. त्यात गुन्हेगारीही वाढली आहे. त्यामुळे समाजात चिंतेचे वातावरण कायमच असतं. हल्ली लहान मुलांसोबतही अनेक गुन्हे आणि धक्कादायक प्रकार घडत असतात. तर अनेकदा त्यांच्यासोबत वाईट घटना आणि अपघातही घडताना दिसतात. तेव्हा पालकांना याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते आहे. त्यामुळे सध्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसही सतर्क झाले आहे. 

जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. करोनामुळे अख्खं जग एका वेगळ्याच संकटाला सामोरं गेलं. त्यामुळे टाळेबंदी आणि आरोग्यपुर्ण काळजी यांसंदर्भात आपण सगळेच खूप सतर्क झालो. करोनाच्या काळात लसीकरणानं खूप मोठा वेग घेतला होता. त्यामुळे लसीकरण हा शब्द चांगलाच प्रचलित झाला. परंतु याच लसीकरणानं लहान मुलांचा घात केला आहे. 

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

दीड महिन्यांच्या बाळाला लसीकरण केल्यानंतर त्या बाळाचा दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा गावात घडलीय. सुरज राहुल राठोड असं या मृत झालेल्या बाळाचे नाव आहे. या बाळाला काल शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण मोहिमे अंतर्गत लसीकरण करण्यात आलं होतं. बाळ जन्मल्यानंतर दिली जाणारी लस त्याला दिली होती. 

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

मात्र लसीकरणानंतर काही वेळाने या बाळाचा दुर्देवी मृत्यू झालाय. याबाबत डॉ अंभोरे यांनी बाळाला तपासून त्याचा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे. दरम्यान या बाळाला सध्या शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं असून त्यानंतर बाळाच्या मृत्युचं नेमकं कारण कळू शकेल. मात्र या घटनेनंतर जिह्यात एकच खळबळ उडालीय.