परळी :जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळीत जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेसुद्धा परळीमधूनच येतात. 

Updated: Mar 10, 2018, 12:46 PM IST
परळी :जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल title=

परळी : महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळीत जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेसुद्धा परळीमधूनच येतात. 

२ कोटी ४१ लाख रुपयांची कामे कागदोपत्री

दरम्यान, प्राप्त माहिती अशी की, जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्या प्रकरणीपरळी तालुक्यातील २४ अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. २ कोटी ४१ लाख रुपयांची कामे कागदोपत्री दाखवून केला अपहार केल्याचा अधिकाऱ्यांवर आरोप आहे. या प्रकरणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी रडारवर आले आहेत

मुख्यमंत्र्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना अशी जलयुक्त शिवार योजनेची ओळख आहे. त्यामुळे या याजनेची जोरदार चर्चा नेहमीच रंगलेली असते. तसेच, प्रसारमाध्यमांचेही या योजनेकडे चांगलेच लक्ष लागलेले असते.