जळगावात चायनिज वस्तूंवर बहिष्कार

यंदा जळगावकरांनी चायनिज वस्तू न वापरण्याचा निर्धार केला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2017, 11:23 AM IST
जळगावात चायनिज वस्तूंवर बहिष्कार title=

जळगाव : देशभरात दिवाळीच्या उत्साहाला सुरूवात झाली आहे. जळगावमध्येही दिवाळी साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा जळगावकरांनी चायनिज वस्तू न वापरण्याचा निर्धार केला आहे. त्यामूळे भारतीय बनावटीच्या वस्तूंना इथे जास्त मागणी आहे.

दिवाळीसाठी पणत्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होतेय. दरवर्षी बाजारात चिनी बनावटीच्या पणत्यांची चलती असते. यंदा मात्र नागरिकांनी चायनीज वस्तूंच्या वापरावर बहिष्कार टाकलाय. 
 याचाच परिणाम पणत्या विक्रीवरही पाहायला मिळतोय. चायनीज गोष्टींवरील बहिष्कार लक्षात घेऊन विक्रेत्यांनी गुजरात आणि राजस्थानातून आणलेल्या पणत्यांना बाजारात नागरिकांची पसंती मिळत आहे.