राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यानच्या नाराजी नाट्यावर पवारांनी सोडंल मौन; म्हणाले...

दिल्लीत भाषण करू न दिल्यामुळे अजित पवार नाराज आहेत का? काय म्हणाले पवार....

Updated: Sep 12, 2022, 01:56 PM IST
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यानच्या नाराजी नाट्यावर पवारांनी सोडंल मौन; म्हणाले... title=

मुंबई : दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार  (Ajit pawar) नाराज असल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व्यासपीठावर गेल्यावर अजित पवार निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवारांमध्ये शीतयुद्ध असल्याचं बोललं जात होतं. अशातच यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं (NCP) दोन दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये पार पडलं. या अधिवेशनामध्ये शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षांच्या पुढच्या वाटचालीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रांत अध्यक्ष या नात्याने जयंत पाटील यांनी राज्याची भूमिका मांडली. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेते आणि प्रांत अध्यक्ष यांनी बोलणं अपेक्षित असतं. म्हणून मी बोलणं टाळलं मात्र माध्यमांनी याचा वेगळा अर्थ काढल्याचं अजित पवार म्हणाले. 

मी एकटाच बोललो नाही असं नाही, सुनिल तटकरे, वंदना चव्हाण आणि अजुन तीन चार नावं जी वेगवेगळ्या राज्याचे प्रतिनिधी  म्हणून आले होते तेही वेळेअभावी बोलू शकले नाहीत. मी वॉशरूमला गेलो तर अजित पवार बाहेर गेले, अरे मी काय बाहेर वॉशरूमला जायचं नाही का?, वस्तुस्थिती आधारित बातम्या देण्याची जबाबदारी आपल्या सर्व चॅनेलची असल्याचं पवारांनी सुनावलं. 

दरम्यान, राज्यामध्ये अधिवेशेन किंवा चर्चासत्र असेल तर मी त्यामध्ये जरूर भाग घेत असतो. माझी भूमिका स्पष्टपणे मांडत असतो, असंही पवार म्हणाले. यावेळी बोलताना लम्पी आजार झालेल्या जनावरांचं लसीकरण झालं पाहिजे अशी मागणीही पवारांनी केली.