चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : बैलगाडा शर्यतीवरुन झालेल्या वादातून(bullock cart race dispute) अंबरनाथमध्ये(Ambernath) तुफान राडा झाला आहे. हा वाद इतका पेटला की थेट गोळीबारापर्यंत पोहचला. अंबरनाथमध्ये दोन गटात अंधाधुंद गोळीबार (Indiscriminate firing)देखील झाल्याचे समजते. या घटनेनंतर अंबरनाथ मध्ये मोठी दहशत पसरली आहे.
अंबरनाथमध्ये दोन गटात अंधाधुंद गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारामुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण अडवली गावातील रहिवासी राहुल पाटील हे आपल्या कारने एमआयडीसी परिसरातून जात असताना त्यांच्या कारवर बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्या समर्थकांनी विटा आणि दगडांनी हल्ला केला.
यावेळी दोन्ही गटाकडून 10 ते 12 राउंड फायर करण्यात आले. मात्र, या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करतात. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक झाली नसल्याचे समजते.