तुम्ही बाटलीबंद पाणी पिताय? सावधान! नागपूरमधील किळसवाणा प्रकार

नागपुरमध्ये अत्यंत किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. कचऱ्यातून बॉटल गोळा करुन पाणी भरुन विकले जातेय. 

वनिता कांबळे | Updated: May 31, 2023, 05:02 PM IST
तुम्ही बाटलीबंद पाणी पिताय? सावधान! नागपूरमधील किळसवाणा प्रकार title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : नागरीकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. कचऱ्यातील बॉटलमध्ये पाणी भरून या बॉटल सील करुन विकण्यात येत होत्या. आरपीएफ पथकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी आरोपीला रेड हँड अटक केली आहे. तसेच त्याच्या साथीदारांसाचा शोध सुरु आहे. 

कचऱ्यातील बॉटलमध्ये अशुद्ध पाणी भरायचे

नागपूर आरपीएफने ही कारवाई केली आहे. कचऱ्यातील बॉटलमध्ये अशुद्ध पाणी भरून रेल्वे प्रवाशांना विकले जात होते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्याला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. इरफान असलम कुरेशी अस अटक करण्यात आलेल्या  आरोपीचे नाव आहे.

झुडपाआड सुरु होती भेसळ

रेल्वेट्रॅकला लागून असलेल्या परिसरात गस्त घालताना आरपीएफला झुडपांमध्ये एका ड्रममध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या पाण्याची बॉटल मिळून आल्या. दरम्यान, याच परिसरात एक ड्रम जमिनीवर फेकतात एक व्यक्ती दिसून आला. त्याचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच त्या परिसराची पाहणी केली तेव्हा रिकाम्या बॉटल आणि सील करण्यासाठीचे बॉटलचे झाकण मिळून आले. आरोपी हा कचऱ्या विकणाऱ्यांकडून बॉटल विकत घेऊन यात अशुद्ध पाणी भरत होता. यानंतर तो या बॉटल सील करुन 15 ते 20 रुपये दराने विकत होता. आरोपीच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत.

पायाने बटाटे तुडवले

आजारी पडल्यानंतर आपण रूग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मात्र एका हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे हे दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.  या व्हिडिओत एक व्यक्ती बटाटे अक्षरश: पायाने तुडवताना दिसत होते. हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे हे समजू शकलेलं नाही, मात्र सोशल मीडियात या व्हिडिओवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होता. रूग्णालयं लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहेत की जीव घेण्यासाठी असा सवाल नेटक-यांनी केला होता. 

वडापावमध्ये सडके बटाटे?

आपण जो वडापाव मोठ्या चवीने खातो तो कुठल्या बटाट्यांपासून तयार करतात हे आपल्याला माहित नसते. अतिशय सडके, काळे आणि कुजके बटाटे वड्यासाठी वापरल्याचा किळसवाणा प्रकार नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी स्टेशनवर पहायला मिळालो होता. इगतपुरी स्टेशनवर अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन थांबतात.  ट्रेन थांबल्यावर भूक भागवण्यासाठी चटपटीत वडापाववर मारला जातो. मात्रय वड्यांसाठी सडका बटाटा वापरला जातो.  फक्त इगतपुरीतच नाही तर अनेक रेल्वे स्टेशन्सवर खराब झालेले बटाटे वड्यासाठी वापरले जातात. स्टेशनवर तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी रेल्वेने स्वतंत्र हेल्थ इन्स्पेक्टर नेमलेला असतो. मात्र त्या अधिका-यांचंही याकडे सर्रास दुर्लक्ष होते.