धक्कादायक, पोलिसांवर अवैध दारु विक्रेते, समर्थकांचा हल्ला

अवैध दारु विक्रेते (Illegal liquor dealers) आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच (Police) हल्ला केला.  

Updated: May 4, 2021, 11:59 AM IST
धक्कादायक, पोलिसांवर अवैध दारु विक्रेते, समर्थकांचा हल्ला  title=

 नागपूर : अवैध दारु विक्रेते (Illegal liquor dealers) आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच (Police) हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना कारवाई न करता रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत "टोली" या वस्तीत अवैध दारु विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस गेले होते. यावेळी पोलीस पथकावर जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला. (Illegal liquor dealers, supporters attack police in Nagpur)

नागपुरात अवैध दारुची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरु आहे. असे असताना अवैध दारु विक्री सुरु असल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दारु विक्रेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांचा हल्ला केला. या हल्ल्यात नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकाची गाडी फोडण्यात आली आहे. त्यामुळे कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आले आहे.

अजनी पोलीस स्टेशनचे एक पथक आज नागपूरच्या कुख्यात टोली नावाच्या वस्तीमध्ये अवैध दारू विरोधात कारवाई करायला गेले होते. संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अवैध दारू विकणारे आणि त्यांच्या काही समर्थकांनी अचानक पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक झाली तेव्हा पोलिसांची संख्या कमी आणि हल्ला करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांना मागे फिरावे लागले.  त्याचवेळी जमावाने पोलिसांची गाडी फोडली.

या घटनेनंतर त्या वस्तीत मोठ्या प्रमाणावर पोलीस पथक पाठविण्यात आले आहे. सध्या पोलीस दगडफेक करत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या स्थिती नियंत्रणात असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.