आनंद महिंद्रा यांनी लॉन्च केली 'ऑक्सिजन ऑन व्हील्स', गरजू लोकांच्या घराघरात पोहोचणार मदत

कोरोना उद्रेकामुळे (Coronavirus)रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोक कोरोनाविरोधात लढा देत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.  

Updated: May 4, 2021, 11:11 AM IST
आनंद महिंद्रा यांनी लॉन्च केली 'ऑक्सिजन ऑन व्हील्स', गरजू लोकांच्या घराघरात पोहोचणार मदत title=
Pic / Twitter @ Anand Mahindra

 मुंबई : कोरोना उद्रेकामुळे (Coronavirus)रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोक कोरोनाविरोधात लढा देत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. बेड, औषध यांच्या तुटवड्यामुळे मोठे संकट निर्माण होत असताना ऑक्सिजनचा (oxygen) तुडवडा जाणवत आहे. देशात ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत आहेत. आता अनेक सेवाभावी संस्था, उद्योगपती ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पुढे सरसावलेत. त्यापैकी एक उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra)होत. त्यांनी लोकांना घराघरात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी  'ऑक्सिजन ऑन व्हील्स'ची सुरुवात केली आहे. 

कोरोना साथीच्या आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे आज संपूर्ण देश झगडत आहे. ऑक्सिजनच्या (oxygen) अभावामुळे बरेच लोक दररोज आपला जीव गमावत आहेत. या कठीण काळात महिंद्रा समूहाचे ( Mahindra Group) अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आनंद महिंद्रा यांनी 'ऑक्सिजन ऑन व्हील्स' सुरु केली आहे.

 'ऑक्सिजन ऑन व्हील्स' उपक्रम

या मोहिमेमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या बोलेरो पिकअप ट्रकद्वारे महाराष्ट्रभर ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवतील. ऑक्सिजन रुग्णालयांमध्ये आणि गरजूंच्या घरात नेले जाईल. आनंद महिंद्रा म्हणाले की, कंपनी आपल्या 70 बोलेरो ट्रकमधून ऑक्सिजन सिलेंडर्स एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचवेल. मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूर येथे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रानंतर  इतर राज्यातही सेवा देणार

आनंद महिंद्रा यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की मृत्यू दर कमी करण्यासाठी आज ऑक्सिजन महत्त्वपूर्ण आहे. समस्या ऑक्सिजनच्या उत्पादनाची नसून उत्पादक झाल्यापासून ते रुग्णालये आणि घरांपर्यंत पोहोचविण्याची आहे. महिंद्रा लॉजिस्टिकच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या 'ऑक्सिजन ऑन व्हील्स प्रोजेक्ट'ने हे अंतर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आनंद महिंद्राने सांगितले की, हा उपक्रम सध्या महाराष्ट्रात सुरू झाला आहे. परंतु लवकरच ते देशातील इतर राज्यांतही नेले जाईल. या कामात आम्ही आमच्या विश्वासू स्थानिक डीलरची मदत घेऊ आणि स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत देऊ.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण  

कोरोना साथीच्या आजारामुळे देशातील सर्व राज्ये वाईट स्थितीत आहेत. परंतु या सर्वांची सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. जिथे आतापर्यंत 46 लाखाहून अधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यापैकी जवळपास 68 हजार लोकांनी उपचारादरम्यान आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत महिंद्राने महाराष्ट्रातून 'ऑक्सिजन ऑन व्हील्स' सुरु केली आहे.

आनंद महिंद्रा  यांचा भावनिक व्हिडिओ  

कोरोना संकटाच्या या काळात सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोका कोलाची जाहिरात जोरदार व्हायरल होत आहे. जो लोकांमध्ये आशा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या व्हिडिओमध्ये नवीन सामान्य दर्शविले आहे आणि लोक एकमेकांना कसे मदत करत आहेत हे सांगितले आहे. याबद्दल आनंद महिंद्रा यांनी कोकाकोलाचे आभार मानले. हा व्हिडिओतून सांगण्यात आले आहे की गरजू लोकांना मदत करण्यासाठी लोक एकत्र कसे आले आहेत.