पतीने केली पत्नीची हत्या

हल्ल्यानंतर हल्लेखोरानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तोसुद्धा गंभीर जखमी झाला आहे.

Updated: Jul 1, 2018, 11:45 AM IST
पतीने केली पत्नीची हत्या title=

कराड: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये वराडे इथं घरगुती वादातुन मुलाने आई आणि पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.  या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. घटनेनंतर मुलानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. सागर सदाशिव घोरपडे असं या हल्लेखोर मुलाचं नाव आहे. तर मोहिनी सागर घोरपडे असं हल्ल्यात मृत झालेल्या पत्नीचे नाव आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोरानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तोसुद्धा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस अधिक तपास करतायत.

नाशिकमध्येही तिहेरी हत्याकांड

दरम्यान, एकाच घरातील तिघांची क्रूर हत्या करण्यात आल्याने नाशिकमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. नाशिकच्या घोटी जवळील खेड भैरव या गावात एकाच घरातील तिघांची हत्या करण्यात आली. हिराबाई चिमटे, मंगला चिमटे आणि पाच वर्षाचा रोहित चिमटे अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून संशयीताला अटक

अत्यंत गंभीर अशा या घटनेमुळे घोटी परिसर हादरून गेला आहे. घोटी पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपी सचिन चिमटे याला अटक केली आहे. सचिन हा हिराबाई आणि मंगला चिमटे यांचा चुलत पुतण्या आहे. दरम्यान हत्येचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही. चिमटे कुटुंबियांनी सचिनला फासावर लटकवण्याची मागणी केलीय.