असा तयार केला जातो पिनकोड?

अगदी रोजच्या वापरात किंवा रोजच्या जीवनशैलीत आपण पिनकोडचा वापर करतो.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 23, 2017, 08:42 PM IST
असा तयार केला जातो पिनकोड?  title=

मुंबई : अगदी रोजच्या वापरात किंवा रोजच्या जीवनशैलीत आपण पिनकोडचा वापर करतो.

कधी स्वतःच्या घरच्या किंवा ऑफिसच्या पत्ता लिहीताना पिनकोडचा समावेश असतो. पिनकोडवरूनच तो विभाग कोणता हे ओळखला जातो. पण हा पोस्टल इंडेक्स नंबर म्हणजे पिन कोड कसा तयार होतो? किंवा ते कसे ठरवले जातं? याबाबतची ही म्हत्वपूर्ण माहिती….

भारताच्या पोस्टाद्वारे हा ६ अंकी पिन कोड दिला जातो. याची शुरूवात १५ ऑगस्ट १९७२ साली झाली. आता वर्तमानात देशात ९ अंकी पिन क्षेत्र आहे. ज्यामध्ये ८ विभिन्न भौगोलिक क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र हा ९ अंकाचा पिन कोड हा भारतीय सैन्य कर्मचाऱ्यांच्या हेतूने आरक्षित केलं आहे. या कोडचा पहिला अंक हा भौगोलिक क्षेत्रातील कुणा एकाला प्रदर्शित करत असतात. दुसरा अंक हा उपक्षेत्र म्हणजे राज्यावरून ठरवला जातो. तर तिसरा अंक हा जिल्ह्याला संबोधित करतो. आणि शेवटचे ३ अंक वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसचे प्रतिनिधीत्व करतात.

कोणत्याही पिन कोडचा अर्थ समजून घेण्यासाठी ही महत्वाची माहिती

उदाहरणार्थ : जर समजा ५०००७२ असा तुमचा पिनकोड असेल तर..
५ : दक्षिण भारत क्षेत्राला संबोधतो
५०: तेलंगणा राज्यासा संबोधित करतो.
५०० : रंगारेड्डी जिल्ह्याला संबोधित करतो
०७२ : हे शेवटचे तीन अंक हे KPHB कालोनीमध्ये असलेल्या पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.

भारतात आता पोस्ट ऑफिसची असलेली सद्यस्थिती

भारतात जगभरातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं पोस्ट ऑफिस आहे. ३१ मार्च २०१४ साली जवळपास १,५४,८८२ पोस्ट ऑफिस आहेत. ज्यामध्ये १,३९,१८२ म्हणजे जवळपास ८९.८६ टक्के पोस्ट ऑफिस ग्रामीण क्षेत्रात आहेत.
स्वातंत्र्याच्या काळात जवळपास २३,३४४ पोस्ट ऑफिस आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक पोस्ट ऑफिस हे शहरात होते. अशा प्रकारे आझादी नंतर भारतात पोस्ट ऑफिसची संख्या सात टक्क्याने वाढली. आणि महत्वाचं म्हणजे पोस्ट
ऑफिसचा सर्वाधिक विस्तार हा ग्रामीण क्षेत्रात झाला. वर्तमानात भारतात जवळपास २१.२२ वर्गकिमी क्षेत्र आणि ८२२१ लोकसंख्येनुसार एक पोस्ट ऑफिस तयार करण्यात आलं.