संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे देणार : डीएस कुलकर्णी

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस.  कुलकर्णी हे आपली संपत्ती विकून गुंतवणुकदारांचे थकीत पैसे देणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी त्यांच्या वकीलांमार्फत न्यायालयात देण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 23, 2017, 07:54 PM IST
संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे देणार : डीएस कुलकर्णी title=

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस.  कुलकर्णी हे आपली संपत्ती विकून गुंतवणुकदारांचे थकीत पैसे देणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी त्यांच्या वकीलांमार्फत न्यायालयात देण्यात आली आहे.

एक आठवड्यांचा दिलासा

या अटीवर डीएसके कुलकर्णी यांना एक आठवड्यांचा दिलासा न्यायालयाने दिलाय. कोणत्या संपत्ती विकणार आहेत याची यादी घेऊन कुलकर्णी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहणार आहेत. 

'गुंतवणुकदारांचे पैसे वेळेत परत करा'

यावर संपत्ती विका किंवा इतर पर्याय सांगा पण गुंतवणुकदारांचे पैसे वेळेत परत करा, अशा शब्दात डीएसकेंना न्यायालयाने फटकारले. 

पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला

दर महिन्याला गुंतवणुकदारांचे १५ कोटी रूपये परत करु हा डीएसके यांचा तोडगाही न्यायालयाने अमान्य केला.  पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला आहे.