अहमदनगर जिल्ह्यातील राहातामध्ये मुसळधार पाऊस

जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे काही शेतांमध्ये ओढ्याचं पाणी घुसलं असून सोयाबिन, मका ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.

Updated: Sep 18, 2017, 09:11 AM IST
 title=

अहमदनगर : जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे काही शेतांमध्ये ओढ्याचं पाणी घुसलं असून सोयाबिन, मका ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.

विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाल्यानं अनेक गावातील सखल भागात पाणी साचलं आहे. शिर्डीतील एका ओठ्याला पाणी आल्यानं मोतोश्रीनगरकडे जाणारा रस्ता बंद झाला असून काही घरांमध्ये पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकही विस्कळीत झाली होती.