गोंदियात अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे उदघाटन

गोंदिया जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे उदघाटन राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचा हस्ते करण्यात आले. 

Updated: Mar 4, 2018, 03:09 PM IST
गोंदियात अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे उदघाटन  title=

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे उदघाटन राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचा हस्ते करण्यात आले. 

या मॉडर्न प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्धघाटन सडक अर्जुनी तालुक्यातील खोडाशिवनी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.  

खोडशीवनी या गावात उभारण्यात आलेल्या मॉर्डन प्राथमिक आरोग्य केंद्रा प्रमाणेच सोयी सुविधा राज्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरविण्यात आल्या तर ग्रामीण भागातील लोकांना खाजगी रुग्णालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणार नाही. 

त्यामुळे या ठिकाणी उभारण्यात आलेला मॉडेल संपूर्ण राज्यात राबवू असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी सांगितले आहे तर या ठिकाणी उभारण्यात आलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत एकाद्या खाजगी इस्पितळाला देखील लाजवेल अशी या आरोग्य केंद्राचा वास्तू आहे