गडचिरोलीत संदेश वाचनाचा विश्वविक्रम

गडचिरोली जिल्हा सतत पोलीस-नक्षल यांच्या चकमकी तर कधी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे चर्चेत असतो. या दुर्दैवी ओळखीचा हा शिक्का पुसण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली पोलीस आणि पुण्याचा आदर्श मित्रमंडळ आणि अहेरीच्या उडाण फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून झाला.  

Updated: Mar 4, 2018, 02:45 PM IST
गडचिरोलीत संदेश वाचनाचा विश्वविक्रम title=

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा सतत पोलीस-नक्षल यांच्या चकमकी तर कधी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे चर्चेत असतो. या दुर्दैवी ओळखीचा हा शिक्का पुसण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली पोलीस आणि पुण्याचा आदर्श मित्रमंडळ आणि अहेरीच्या उडाण फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून झाला.  

या उपक्रमाचे साक्षीदार ठरले अतिदुर्गम भागातून आलेले पाच हजार विद्यार्थी आणि जिल्हयातले दोन हजार नागरिक एकूण 'सात हजार 41' नागरिकांनी यात सहभाग घेतला. 

समाजामध्ये शांतता व समतेचा प्रसार व्हावा, जगात शांतता नांदावी यासाठी अहिंसा आणि शांतता संदेश वाचन कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदानावर आयोजित करण्यात आला होता. 

यापूर्वी तुर्की या देशात असा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न मोडण्याचा प्रयत्न झाला. गडचिरोलीत झालेल्या या नव्या विक्रमाची अधिकृत घोषणा गिनीज बुक वर्ल्ड रेकार्ड या संस्थेकडुन येणा-या वीस दिवसानंतर केली जाणार आहे.