चंद्रपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आज अधिका-यांवर चांगलेच भडकले. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात जेनेरिक औषधालयाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक अनुपस्थित राहिले होते. यामुळे संतप्त झालेल्या अहिर यांनी वैद्यकीय अधिका-यांना चांगलाच दम भरला.
'तुम्हाला लोकशाही नको असल्यास नक्षल्यांप्रमाणे गडचिरोलीत जा. नक्षल्यांमध्ये भरती झाल्यावर आम्ही तुम्हाला गोळ्या घालू'... असं विधान हंसराज अहिर यांनी केलं आहे.