Manoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम

Manoj Jarange-Patil :  मराठा आरक्षणासाठी मिळल्याशिवाय आता माघार नाही, असा ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायभूमीत जरांगे पाटील पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात 

Updated: Jan 21, 2024, 10:33 AM IST
Manoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम title=
grand welcome Diwali once again in the homeland of Manoj Jarange Patil beed gevrai

Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीवरुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचं मायभूमीत जोरदार स्वागत झालं. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये दिवाळीचं स्वरुप दिसून आलं. जवळपास 50 जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या स्वागतात असंख्य मराठी बांधव जमा झाले होते. (grand welcome Diwali once again in the homeland of Manoj Jarange Patil beed gevrai)

मनोज जरांगे पाटील याच्या पदयात्रेचा दुसरा दिवस असून अहमदनगरच्या दिशेने घेताला आहे. आम्ही पूर्ण ताकदीने मराठी आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहे. 26 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात हा मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा दाखल होणार असून हा आरक्षणासाठी शेवटचा लढा असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

दरम्यान गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचं आगमन झालं त्यावेळी 50 जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवष्टी करण्यात आली.  यावेळी मनोज जरांगे पाटील यांना शेकडो तोफांची सलामी देत एक मराठा लाख मराठा या घोषणेने शहर दणाणून गेलं होतं. भगव्या झेंडयांनी शहर गजबजून गेलं होतं. दरम्यान, मराठा बांधवांसाठी कोळगाव इथे जेवणाची व्यवस्था केली होती. परिसरातील आसपासच्या 50 गावांनी भाजी भाकरी पिठलं, अशा जेवणाची 20 ठिकाणी सोय करण्यात आली होती.  

तर जरांगेंच्या मायभूमीत तर पुन्हा एकदा दिवाळीचे वातावरण दिसून आलं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण देण्याच्या मागणीचं अंतरवाली सराटीतून आंदोलनाची पुढील दिशा ठरविणारी अंतिम इशारा सभा जिल्ह्यात संपन्न झाली. 

दादागिरीची भाषा करू नका!

आम्हाला मुंबईत येऊ नका असं म्हणतात, आम्ही जर म्हटलं त्यांना की तुम्ही मुंबईत येऊ नका तर जमेल का?, असा थेट प्रहार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मुंबईत येऊ नका असं म्हणणं ही कोणती भाषा आहे. दादागिरीची भाषा करू नका, असा पलटवारही त्यांनी केला आहे. आम्ही तुमच्यावर गुलाल टाकायला येतोय, तुम्ही नशीबवान आहात. काम झाल्यावर लोक विसरून जातात, मात्र तुम्ही भाग्यवान आहात की करोडो मराठे तुमच्यावर गुलाल टाकायला येत आहेत, असं जरांगे हे म्हणाले. आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणत त्यांनी पुन्हा राज्य सरकारला अल्टीमेटम दिलं आहे.