रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : राज्यात नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. पण या निवडणुकीत प्रचाराबरोबरच काही ठिकाणी करणी, भानामती (Black Magic) यासारखे प्रकार अघोरी प्रकार करण्यात आले. कोल्हापुरातल्या राधानगरी (Kolhapur Radhanagari) तालुक्यातील बामणी गावांत चक्क चार परप्रांतीय साधूंना बोलावण्यात आलं होतं. तर सांगलीत भानामती, करणीसारेखे प्रकार केल्याचं समोर आलं होतं. ग्रामपंचायत निवडणूक विजयासाठी उमेदवारांनी राजरोसपणे अंधश्रद्धेचा (Superstition) बाजार मांडला तर पोलीस प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवण्यापलिकडे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
तीन हजार लिंबांचा उतारा
पण आता यासर्वांवर कडी करणारा एक धक्कादायक प्रकार सांगली (Sangli) जिल्ह्याच्या कवठेमंहाकाळ तालुक्यातील चुडेखिंडी इथं समोर आला आहे. निवडणूक जिंकावी यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी लिंबू (Lemon) मंतरुन ते जमिनीत पूरले होते. तर नव्या सत्ताधाऱ्यांनी आता निवडून आल्यानंतर चक्क तीन हजार लिंबू मंत्रून उतारा टाकला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या लिंबु वरून गाडी चालवून जल्लोष केला. सर्वत्र या अघोरी प्रकाराची चर्चा सुरू आहे. निवडून आलेल्या सरपंच उमेदवाराने आपल्या मिरवणुकीच्या वाटेवर चक्क तीन हजार लिंबूचा उतारा टाकला. त्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार निवडणुकीमध्ये होत असल्याचे समोर आलं आहे.
विकासाने पुढारलं, अंदश्रद्धेने माागासलं
सांगली जिल्ह्यातील चुडेखिंडी गाव हे पूर्वी कायम दुष्काळी म्हणून ओळखलं जात होतं. उन्हाळ्यात सर्वात अगोदर टँकरने या ठिकाणी पाणीपुरवठा केला जात होता. जलयुक्त शिवारमधून मोठ्या प्रमाणात कामे झाली आणि हे गाव पाण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे स्वयंपूर्ण झालं.
पण विकासाच्या बाबतीत गाव पुढारलेलं असलं तरी अंधश्रद्धेमुळे हे गाव अजूनही मागासलेलं आहे असंच म्हणावं लागेल.
हे ही वाचा : गुजरातमध्ये 'सांता क्लॉज'वर हल्ला, कपडेही फाडले
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जमिनीचे खाली लिंबू पुरल्याचा आरोप केला जात होता. गावात सत्तांतर झालं. मात्र सत्तेत आलेल्या नव्या पॅनलच्या पुढार्यांनी अंधश्रद्धेचा कळसच केला. गुलाललाने माखलेले तीन हजार लिंबू गावात फेकण्यात आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या लिंबु वरून गाडी चालवून जल्लोष केला.