नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या विमा योजनेचे सर्वेक्षण आता सुरू झालय. यातून येत्या काळात शेतक-यांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्यावर्षी खरीप हंगामात बोगस बियाणे, बोंडअळी, अल्प पजर्न्यामुळे नापिकी यात घेरल्या गेलेल्या शेतक-यांना उत्पादनात फटका बसला होता. शासनाने पंचनामे केल्यानंतरही शेतक-यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही. विमा कंपन्यांकडून वर्ग करण्यात आलेल्या अहवालानंतर येत्या जून पर्यंत शेतकर्यांना विम्याची रक्कम मिळणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांना 2015-16 या वर्षात 34 कोटी रूपयांचा विमा परतावा शेतक-यांना मिळाला होता. यंदा विम्यासाठी जिल्ह्यातील 14 हजार 717 शेतकर्यांनी अर्ज केले होते. हे सर्वच अर्ज विमा कंपन्यांनी ग्राह्य धरून कामकाजाला सुरूवात केली आह़े विशेष म्हणजे या विमा संरक्षणात बोंडअळीमुळे नुकसान झालेला कापूस आणि बोगस बियाणांमुळे शेतक-यांच्या हातून गेलेल्या ज्वारीचाही समावेश असल्याची माहिती आह़े.