स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, काय आहे आजची किंमत?

Gold Silver Rate Today : सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे सोने चांदी दर एकदा नक्की तपासा. आज सोने चांदीच्या दरात किंचीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Feb 14, 2024, 12:49 PM IST
स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, काय आहे आजची किंमत?  title=

Gold Silver Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोने चांदीच्या दरवाढीच्या मागे अनेक कारणं सांगितले जात आहे. अनेक देश सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असतात. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वर्षभरात वाढली होती. ग्रामीण भागातील महिला तर आजही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहताच. म्हणूनच दर गुरुपुष्यामृत योगावर एक ग्रॅम का होईना सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. शहरी भागात महिलांना छंद म्हणून सोने खरेदी करतात. तर दुसरीकडे सरकारी कर्मचारी तर सोन्याकडे गुंतवणुकीचे मोठे साधन म्हणून पाहतात. 

2023 जूनपासून सोन्याचे दरात वाढ

सोन्याच्या दरात मे महिन्यात 55 हजारांवरून 60 हजारांची उसळी झाल्याची पाहायला मिळाली. तर जून महिन्यात 60 हजारांपर्यंत सोने गेले. नोव्हेंबरपर्यंत सोने 69 ते 60  हजारच्या घरात होते. तर नोव्हेंबरच्या दिवाळीच्या पर्वात सोने 61 हजारांवर उसळी घेतली. डिसेंबर 2023 पर्यंत सोन्याचे दर वाढतच राहिले. सध्या सोन्याचा दर 63 हजार रुपये प्रति तोळा आहे. वर्षभरात सोन्याने ग्राहकांना प्रति तोळ्यामागे 8 हजार 200 रुपयांचा नफा मिळवून दिला.

चांदी वर्षभरातून दोनवेळा उच्चांकी गाठली 

चांदीची किंमत केवळ 69 हजार रुपये होती. तर मार्च 2023 मध्ये 72 हजार रुपयांवर पोहचली. मे महिन्याच चांदील पहिला उच्चांक दर 77 हजार रुपये प्रति किलो मिळाला.  त्यानंतर चांदीचे दर कमी होत ऑक्टोबरमध्ये 71 हजारांपर्यंत खाली आला. डिसेंबरमध्ये पुन्हा ७८ हजारांचा उच्चांक गाठला गेला. सध्या चांदीचा दर 75 हजारांपर्यंत पोहोचले आहे. 

तुमच्या शहरातील सोने चांदीचे आजचे दर 

आज (14 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61,590 रुपये आहे. तर सराफा बाजारात चांदी 69,910 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,357 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,357 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,480 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,357 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,480 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,357 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 61,480 रुपये आहे. 

सोन्या चांदीचे वाढते दर पाहता सोन्यातील गुंतवणूकही वाढली आहे. अडचणीच्या काळात सोने मोडून चांगला परतावाही मिळतो. जानेवारी 2023 मध्ये सोने 55 हजार 300 रुपये प्रति तोळा झाले असते. डिसेंबर 2023 अखेर सोन्याचा दर 63 हजार 200 झाला. ग्राहकांना प्रति तोळामध्ये 8,200 रुपये एकूण नफा झाला आहे. जानेवारी 2023 पर्यंत चांदी 69 हजार रुपये प्रतिकिलो झाली होती. तर डिसेंबरअखेर 75 हजारांवर पोहचला. सहा हाजारांचा नफा ग्राहकांना वर्षभरापूर्वी घेतलेल्या चांदीतून झाला आहे. जवळपास जानेवारी 2023 मध्ये सुवर्ण नगरीमध्ये  सोन्याने 55 हजारांची खरेदी करून 58 हजार 500 चा विक्रमी टप्पा गाठला होता. त्यामुळे सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांनी थांबा आणि बघा अशी भूमिका घेतली.