मुलाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकर यांनी कट रचला; प्रविण दरकेर यांचा गंभीर आरोप

शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईमागे नेमकं काय कारण काय आहे जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Updated: May 22, 2024, 08:53 PM IST
 मुलाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकर यांनी कट रचला; प्रविण दरकेर यांचा गंभीर आरोप title=

Maharashtra Politics 2024 :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दोन जुन्या शिलेदारांमध्ये चांगलीच जुंपलीय. गजानन कीर्तिकरांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदेंनी केलीय. या वादावर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर खरचं पक्षांतर्गत कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

प्रवीण दरेकर यांचा गजानन किर्तीकरांवर गंभीर आरोप 

प्रवीण दरेकरांनी गजानन किर्तीकरांवर गंभीर आरोप केलाय. शिंदे गटातून तिकीट घ्यायचं आणि अर्ज माघारी घेऊन मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा किर्तिकरांचा कट होता. असा आरोप दरेकरांनी केलाय...हा किर्तिकरांचा कट होता असंही दरेकर म्हणालेत.

समोर मुलगा उभा असताना द्विधा मन:स्थित होऊ शकते - दीपक केसरकर

महाभारता देखील अर्जुनाने आपला धनुष्यबाण हा खाली ठेवला होता तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितल की युद्धात समोर आपला नातेवाईक असेल तरी त्याला शत्रू म्हणून लढायचं असतं. पण असा इथे झाल नाही. गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे प्रचार केला नाही पण ते शांत बसले होते पण हे वाद जे होत आहे त्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री आणि गजानन कीर्तीकर यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा. शिशीर शिंदेंच्या गजानन किर्तीकरांवरील आरोपांनंतर दीपक केसरकरांनी यावादाबाबत वक्तव्य केले. समोर मुलगा उभा असताना द्विधा मन:स्थित होऊ शकते..मात्र, किर्तीकरांनी मुलाचा प्रचार नाही केला...आता निवडणुका संपल्या आहेत, हा विषय पण संपवला पाहिजे असं केसरकर म्हणालेत...तर मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेतील असंही ते म्हणालेत.

नेमका कशामुळे झाला वाद?

गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. गजानन किर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. त्यामुळे मातोश्रीचे 'लाचार श्री' होणा-यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा.  गजानन किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. तेव्हा गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी केली आहे. याची सुरुवात झाली ती मुंबईतल्या मतदानाच्या दिवशी कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नीने केलेल्या विधानांवरुन. मुलगा की नवरा? अमोल कीर्तिकरांची मशाल की गजानन कीर्तिकरांचं धनुष्यबाण? या वादात आई मेघना कीर्तिकर यांनी शेवटी आपल्या मुलाचीच बाजू घेतली. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याच पारड्यात त्यांच्या मातोश्रीनं मत टाकलं. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत.. तर आपले पती शिवसेना नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना त्यांनी चक्क घरचा आहेर दिला.  तुम्ही वरिष्ठ असून एकनाथ शिंदेंना सलाम ठोकणार का? असा बोचरा सवाल त्यांनी मिस्टर कीर्तिकरांना उद्देशून केला. गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईचे मावळते खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाणं पसंत केलं.