जळगाव : सेल्फी काढण्याचे नादात खिरोडा पूर्णेच्या पात्रात मुलासह नवरा बायको पुरात वाहून गेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडलीय. मुला सह नवरा बायको खिरोडा येथील पूर्णेच्या नवीन पुला खाली गेले होते. लहान मुलगा सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पुराचे पाण्यात वाहून जाताना दिसताच आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता ती पण पाण्यात घसरली .
दोघे माय लेक वाहत असल्याचे पाहून बापानेही पात्रात धाव घेतली आणि तेही पाण्यात वाहत गेल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच खिरोडा येथील लोकांनी पुलाकडे धाव घेतली. नदीला मोठा पूर आलेला असून पुलाचे १० फूट खोल पाणी वाहत आहे.
वाहून गेलेले कुटुंब जळगाव जामोद चे असून राजेश चव्हाण त्यांचं नाव आहे तर राजेश यांच्या पत्नी सारिका तसेच मुलगा श्रवण हे तिघेही सोबत होते.