सांगली जिल्ह्यात सकाळच्या सत्रात ३६ टक्के मतदान

  सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूकीत सकाळी साडे अकरापर्यंत 36 टक्के मतदान झाले आहे.  या  निवडणुकीत भाजपा खासदार संजय काका पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तर माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2017, 01:20 PM IST
सांगली जिल्ह्यात सकाळच्या सत्रात ३६ टक्के मतदान  title=

सांगली :  सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूकीत सकाळी साडे अकरापर्यंत 36 टक्के मतदान झाले आहे.  या  निवडणुकीत भाजपा खासदार संजय काका पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तर माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
सांगली जिल्ह्यात ४२४ सरपंच पदासाठी ११४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी १६३० जागा पैकी ३८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. १२४१ सदस्य पदासाठी मतदान होत आहे. यासाठी ८९८१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व जगासाठी एकूण १०,०५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 एकूण १० लाख ३६ हजार इतके मतदार मतदानाचा हक्क बजावण्यात आलं. 
 या मतदानासाठी १०,७४० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.१९२६ मतदान केंद्रा पैकी ३४२ केंद्र संवेदनशील तर १८ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत.