Eknath Shinde : आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?

Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय.  (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)   

Updated: Feb 21, 2023, 08:09 AM IST
Eknath Shinde : आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार? title=

Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय.  (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)  संध्याकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra Political News)

याआधी ठाकरे गटाने शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली होती. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde ) मात्र, आता शिवसेना पक्ष शिंदेंच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांनी दावा केला आहे. नवीन राष्ट्रीय कार्यकारणी कशी पाहिजे ? त्यात कोण कोण असतील यावर चर्चा होणार असून पहिल्या सारखी शिवसेनेची एक राष्ट्रीय कार्यकारणी असावी यासाठी ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे.

Thackeray Vs Shinde LIVE Updates : ठाकरे विरुद्ध शिंदे सेना वाद, सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

अधिवेशनात व्हिप लागू करुन शिंदे गट ठाकरे गटाची कोंडी करण्याची शक्यता आहे. मात्र ठाकरे गटाच्या एका आमदाराला हा व्हिप लागू होणार नाही, त्या आमदार आहेत अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी ठरलेल्या ऋतुजा लटके. शिंदे आणि ठाकरे गटात फूट पडल्यानंतर अंधेरीची पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव दिलं होते. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. तेव्हा ऋतुजा लटके यांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार नाही.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात काल आव्हान दिलं. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी काल ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले.  अर्ज मेन्शन न करताच ठाकरे गटाने सुनावणीची विनंती केली होती. मात्र तातडीने सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मेन्शनिंग लिस्टमध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे, लिस्टेड नसताना कोणतीही तारीख कोर्ट देऊ शकत नाही, असं कोर्टाने ठाकरे गटाला सुनावले. त्यानुसार आज सकाळी साडे दहा वाजता ठाकरे गट आपली केस दाखल करणार आहे. त्यावर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.