SSC HSC Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो...काही मदत लागल्यास लगेच 'या' नंबरवर फोन करा!

SSC HSC Exam: आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू, हॉलतिकीट हारवलंय, आणखी काही हवंय? मदत लागल्यास 'या' फोननंबर लगेच कॉल करा!

Updated: Feb 21, 2023, 08:06 AM IST
SSC HSC Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो...काही मदत लागल्यास लगेच 'या' नंबरवर फोन करा! title=
SSC HSC Exam

HSC Board Exams: बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) मंगळवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे आता विद्यार्थी तसेच पालकांच्या मनात धाकधूक निर्माण होत आहेत. कोरोनानंतर (Covid) पहिल्यांदाच नियमित पद्धतीने परीक्षा होत असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात दिसत आहे. बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी तर, दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 मार्चपासून सुरु होत असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (Secondary and higher secondary education) एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या.

विद्यार्थ्यांनो टेन्शन घेऊ नका 

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने काही दिशानिर्देश विद्यार्थ्यांना दिले आहेत. परीक्षा वेळेच्या अर्धातास आधी अर्धा तास उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं आहे. 

हेल्पलाईन क्रमांक -

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अनेकदा विद्यार्थी तणावात दिसतात. त्यामुळे अनेकदा गडबड होण्याची शक्यता असते. काहींचं हॉलतिकीट विसरून जातं तर काही जणांना वेगवेगळ्या पद्धतीने समस्या जाणवू लागतात. त्यासाठी शिक्षण मंडळाने पाच ही जिल्ह्यात प्रत्येकी दोन समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासाठी काही संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. तुम्हाला काही अडचण आल्यास या क्रमांकावर फोन करू शकता. (HSC Board Exams starts from today important instructions and helpline number for students latest marathi news)

आणखी वाचा - HSC Board Exams : आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचा

जिल्हा समुपदेशक

औरंगाबाद बाळासाहेब चोपडे (९२८४८४७५८२)
शशीमोहन सिरसाट (९४२२७१५५४६)
बीड एस. पी. मुटकुळे (९६८९६४०५००)
चेतन सौंदळे (९४२२९३०५९९)
जालना एस. टी. पवार (९४०५९१३८००)
सूर्यकांत खांडेभरड (९४०४६०६४७९)
परभणी पी. एम. सोनवणे (९४२२१७८१०१)
आमिर खान (९८६०४४४४९८६)
हिंगोली एस. जी. खिल्लारे (९०११५९४९४४)
डी. आर. चव्हाण (९८२२७०६१०२)

दहा मिनिटांचा वेळ अधिक

शिक्षण मंडळाकडून नियमित वेळेच्या 10 मिनिटआधी अधिकचा वेळ दिला जात होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी नियमित वेळेनंतर 10 मिनिट अधिकचा वेळ दिला जाणार आहे. तर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा वितरण हे बरोबर 11 आणि 3 वाजता होणार आहे.