डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : तपास यंत्रणेवर अमोल पालेकरांची नाराजी

आरोपपत्र दाखल करत पुढची कारवाई लवकर पुर्ण करणं गरजेचं आहे असं मतही पालेकर यांनी मांडलं   

Updated: Aug 20, 2018, 04:21 PM IST
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : तपास यंत्रणेवर अमोल पालेकरांची नाराजी title=

मुंबई : अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाबाबत महाराष्ट्र पोलिस,सीबीआय, कर्नाटक पोलिस यांच्यात समन्यव नसल्याबद्दल न्यायालयानं नाराजी दर्शवली आणि एकत्र बैठका घ्यायला सांगूनही अद्यापही तपासात समन्वय दिसत नाही अशी टिका ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केलीये. आता पकडण्यात आलेले मारेकरी खरे आहेत असं समजूया पण त्यांच्यावर लवकर आरोपपत्र दाखल करत पुढची कारवाई लवकर पुर्ण करणं गरजेचं आहे असं मतही पालेकर यांनी मांडलं   

अजून किती वर्षे ?

पाच वर्षात केवळ दोन जणांनाच अटक झाली ..याच गतीने हा तपास सुरू राहणार आहे का???मग यापुढे किती वर्षे जाणार.?? असाही सवाल  त्यांनी उपस्थित केला.