सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा; संगीता खोत महापौर

नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालं होत.

Updated: Aug 20, 2018, 01:07 PM IST

सांगली: सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाचा आज फैसला झालाय. संगीता खोत यांची महापौरपदी निवड झालीय. खोत सांगली महापालिकेत भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या आहेत. तर, उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांचीही निवड जवळपास निश्चित मानली जातेय.

बहुमतात असलेल्या भाजपने आपल्या ४२ सदस्यांना गोव्याला पाठविले आहे. ते तेथून थेट मतदानासाठी दाखल झालेत. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालं होत.