तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची उद्दाम डॉक्टरांना मारहाण

रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांडून डॉक्टरांना मारहाणीचा प्रकार पुन्हा एकदा घडलाय. 

Updated: Mar 24, 2018, 04:09 PM IST
तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची उद्दाम डॉक्टरांना मारहाण title=

पिंपरी चिंचवड : रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांडून डॉक्टरांना मारहाणीचा प्रकार पुन्हा एकदा घडलाय. 

पिंपरी चिंचवड केतन अशोक गायकवाड या २६ वर्षीय तरुणाला डी वाय पाटील रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर डॉक्टरांकडून उडवा उडावीची उत्तर दिल्यानं संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. 

या मारहाणीनंतर मात्र अनिवासी डॉक्टरांनी अघोषित संप पुकारलाय.