नागपूर : Rain damages fields in Vidarbha : विदर्भातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यात नुकसानीचा फडणवीसांनी आढावा घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी फडणवीस संवाद साधत असून, ते आढावा घेत आहेत.
पावसामुळं उभं पीक आडवं झाल्याने शेतक-यांना योग्य ती मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिले आहे. आज फडणवीस वर्धा, वर्धा, चंद्रपूरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नागपुरात आढावा बैठक होणार आहे.
वर्ध्याच्या वाघोडी नदीच्या किना-याच्या गावात पुराचं पाणी साचले आहे. त्याठिकाणी फडणवीस पाहणी करत आहे. वर्ध्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर चंद्रपुरातील पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत. अतिवृष्टीमुळं विदर्भात पूरस्थितीनिर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 1 जुलै पासून पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या 10 दिवसांत जिल्ह्यातील 50 महसुली मंडळांपैकी 35 मंडळात सातत्याने अतिवृष्टी होत आहे.या मंडळात एक-दोनदा नव्हे तर चार वेळा अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात कापूस- सोयाबीन- तूर आणि धान ही प्रमुख पिके आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा आकडा मोठा आहे.
कापूस- सोयाबीन- तूर- धान पिकाचे 55 हजार 911 हेक्टरवर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीनंतर महसूल-कृषी आणि क्षेत्रीय यंत्रणांनी सर्वेक्षण अभियान वेगवान केले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भर पावसात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली. यात सोयाबीन पिकाचे सर्वाधिक 25 टक्के नुकसान झाले आहे. त्या खालोखाल कापूस, धान आणि तूर पिकांचा समावेश आहे.