औरंगाबाद : कालेलकर, मंडल आयोग नंतर मागासवर्गीयांसाठी तिसरा रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला आहे.
आक्टोबर महिन्यात या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाळासाहेब सराटे यांनी न्यायमूर्ती रोहिणी आयोगासमोर ओबीसी आरक्षणासंदर्भात निवेदन दिले. नव्याने मागासलेपण तपासून ओबीसीच्या तीन कॅटगरी करण्याची विनंती त्यांनी केली. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून याबाबत निवेदन दिले जाणार आहे.
व्हलरनेबल क्लास (अतिमागास), मध्यम आणि उच्च असे विभाजन करावे. ओबीसी मधील एका गटाला आरक्षणाचा फायदा मिळाला नाही, असं सराटे यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडिओ