'ती' संवेदनशील वस्तू घेऊन जवानाला डान्स करणं पडलं महागात; पाहा पुढे काय झालं...

आजकाल अनेक ठिकाणी डान्स आणि गाणं बजावणं सगळीकडेच सुरू असतं. त्यामुळे सध्या अशाप्रकारचे कार्यक्रमही खूप ठिकाणी होऊ लागले आहेत. 

Updated: Nov 22, 2022, 02:40 PM IST
'ती' संवेदनशील वस्तू घेऊन जवानाला डान्स करणं पडलं महागात; पाहा पुढे काय झालं... title=

Army Officer News: आजकाल अनेक ठिकाणी डान्स आणि गाणं बजावणं सगळीकडेच सुरू असतं. त्यामुळे सध्या अशाप्रकारचे कार्यक्रमही खूप ठिकाणी होऊ लागले आहेत. परंतु डान्स करतानाही आपण नक्की कोणती काळजी घ्यायला हवी याची जाण काहींना नसते. त्यामुळे ते गोत्यात सोपडतात सध्या असाच एक प्रकार जालन्यात घडला आहे. ज्यामुळे एका सैन्य जवानाला पिस्तुल घेऊन नाचणं महागात पडलं आहे. यामुळे त्याच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dancing with a pistol case was registered against the army soldier in Ambad police station jalna crime new marathi)

जाणून घ्या नेमका प्रकार : 

काल जालना जिल्ह्यात मोठ्या उत्साहात टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली.अंबड शहरातही जयंतीनिमित्त उत्साह पहायला मिळाला. मात्र या मिरवणुकी दरम्यान सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाला पिस्टल घेऊन नाचणं चांगलंच महागात पडलंय.अंबड शहरात मिरवणूक सुरू असताना सैन्यदलात कार्यरत असलेल्या शेख बिलाल शेख दिलावर या जवानानं त्यांची परवाना असलेली पिस्टल काढत एकाच्या खांद्यावर बसून पिस्टल फायरिंगच्या स्थितीत धरून अर्धा तास डान्स केला.त्यांच्या या कृत्याने पोलिसांनी पिस्टल जप्त करत त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपलं नाव शेख बिलाल शेख दिलावर असल्याचं सांगत आपण सुट्टीवर असल्याचं सांगितलं तसेच अंबड शहरातील मेहबूबनगर परिसरात राहत असल्याची माहिती दिली.दरम्यान या प्रकरणी या सैनिकावर अंबड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे हे करत आहे. 

ऑनलाईन आहात... आत्ताच व्हा सावध! 

राज्यभरात ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंड आरोपीच्या दत्तवाडी पोलिसांनी राजस्थान मधून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या धमकीने एका तरुणाने इमारतीवरून उडी मारली होती.अन्वर सुबान खान (वय - 29, रा. गुरूगोठडी, ता. लक्ष्मनगढ, जि. अलवर, राज्य-राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे.फिर्यादी तरुणाला इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या 19 वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो पाठविण्यात आला होता. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट पाहिल्यानंतर लगेच आरोपीने तो डिलीट केला. त्यानंतर तक्रारदाराच्या भावाच्या मैत्रीणीने फोन केला. त्यांच्या भावाला कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्युूड व्हिडीओ कॉल करून, ब्लॅकमेल करीत साडे चार हजार रुपये उकळल्याचे सांगितले. मात्र, तरीही आरोपीने संबंधित तरुणाला पैसे मागितले. बदनामीला कंटाळून तरुणाने 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने तांत्रीक विश्लेषण करून आरोपीची माहिती काढून अटक केले.