सागर आव्हाड, झी मीडिया, Pune Sextortion Case : हल्ली अश्लीलतेचे स्वरूप वाढताना दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांनाच एक वेगळीच चिंता राहिली आहे कारण हल्ली सायबर क्राईमचे (Cyber Crime) गुन्हेही वाढू लागले आहेत त्यात सध्या अशा गुन्हाेगारांची गळचेपी होण्याऐवजी हे प्रकार वाढतच जात आहेत. त्यामुळे सध्या अशा प्रकरणांना आळा घालणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. सध्या असाच एका धक्कादायक (Shocking News) प्रकार घडला आहे. ज्यामुळे सगळीकडेच भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (pune sextortion case mastermind arrested in Rajasthan crime new marathi)
राज्यभरात ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंड आरोपीच्या दत्तवाडी पोलिसांनी राजस्थान मधून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या धमकीने एका तरुणाने इमारतीवरून उडी मारली होती.अन्वर सुबान खान (वय - 29, रा. गुरूगोठडी, ता. लक्ष्मनगढ, जि. अलवर, राज्य-राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फिर्यादी तरुणाला इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) त्यांच्या 19 वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो पाठविण्यात आला होता. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट (Screendshot) पाहिल्यानंतर लगेच आरोपीने तो डिलीट (Delete) केला. त्यानंतर तक्रारदाराच्या भावाच्या मैत्रीणीने फोन केला. त्यांच्या भावाला कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्युूड व्हिडीओ कॉल (Video Call) करून, ब्लॅकमेल करीत साडे चार हजार रुपये उकळल्याचे सांगितले. मात्र, तरीही आरोपीने संबंधित तरुणाला पैसे मागितले. बदनामीला कंटाळून तरुणाने 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची माहिती काढून अटक केले.
हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
आरोपी राजस्थान (Rajasthan) मध्ये असल्याचे समजताच पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या नातेवाईकांनी आणि गावातील लोकांनी पोलिसांना विरोध करीत दगडफेक करुन पळवून लावले. मात्र, तरीही पथकाने तब्बल अडीच किलोमीटर पाठलाग करून जीवाची पर्वा न करता आरोपीला दत्तवाडी पोलीस पथकाने ताब्यात घेतले. राजस्थान गावातील सर्वाधिक मुले व महिला अशाप्रकारचे ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनचे प्रशिक्षण घेवून नागरिकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रमाण गुरूगोठडी ता. लक्ष्मणगढ जि. अलवर (राजस्थान) गावात मोठया प्रमाणात चालत असल्याचे दिसून आले आहे.