औरंगाबाद : शहरात कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. सोळा वर्षाचा मुलगा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. औरंगाबादमध्ये येथे एका बेकरीत काम करत होता. त्याला चार दिवसांपासून त्याला सर्दी खोकल्याचा त्रास होता. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि तात्काळ कोरोनासाठी तयार केलेल्या विशेष वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आलेले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
#BreakingNews । औरंगाबाद शहरात कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयामध्ये उपचारासाठी विशेष वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेय । त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आलेले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. #coronavirusindia #coronavirus pic.twitter.com/TmFpATJoSR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 12, 2020
महाराष्ट्रामध्येही कोरोना संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपुरामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर आता औरंगाबादमध्ये आणखी एक संशयित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर पोहोचली आहे. नागपूरमध्ये एका रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या रुग्णावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोनाची लागण झालेला हा रुग्ण अमेरिकेतून नुकताच भारतात परतला आहे.
नागपूर आधी पुण्यात कोरोनाचे ८ आणि मुंबईत २ रुग्ण आढळले आहेत. दुबईत फिरायला गेलेला ४० जणांचा एक ग्रुप भारतात परतल्यानंतर कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. दुबईतून भारतात आलेले पर्यटक टॅक्सीने घरी परतले. त्यापैकी पुण्यात टॅक्सी नेलेल्या चालकालाही कोरोनोची लागण झाली. तसेच या सगळ्या रुग्णांना झालेली बाधा सौम्य आहे.
कोरोनाचा धोका रोखण्यासाठी भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हीसांना सरकारने स्थगिती दिली आहे. तसेच एअर इंडियानेही इटली आणि दक्षिण कोरियासाठीची सर्व विमाने रद्द केली आहेत.