राज्यात एका दिवसात कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक वाढ, ३४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Updated: May 6, 2020, 09:54 PM IST
राज्यात एका दिवसात कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक वाढ, ३४ जणांचा मृत्यू title=

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात एका दिवसामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मागच्या २४ तासात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १,२३३ने वाढला आहे, तर दिवसात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६५१ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १६,७५८ एवढी झाली आहे. आजच्या दिवसात कोरोनाच्या २७५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातल्या १६,७५८ कोरोना रुग्णांपैकी एकट्या मुंबईत १०,७१४ रुग्ण आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंत ४१२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीमध्ये आज ६८ रुग्ण वाढले आहेत आणि एकाचा मृत्यू झाला आहे. 

आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १८  रुग्ण आहेत तर १३  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ३ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील आकडेवारी (कंसात मृत्यूंची संख्या)

मुंबई महानगरपालिका: १०,७१४ (४१२)

ठाणे: ८६ (२) 
ठाणे मनपा: ५४३ (८)
नवी मुंबई मनपा: ५१९ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २४७ (३)
उल्हासनगर मनपा: १३
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १८७ (२)
पालघर: ३६ (१)
वसई विरार मनपा: १७५ (४)
रायगड: ६० (१)
पनवेल मनपा: ११५ (२)
ठाणे मंडळ एकूण: १२,७१६ (४४१)

नाशिक: २४
नाशिक मनपा: ४८
मालेगाव मनपा:  ३९१ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ५१ (११)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ६३२ (३१)

पुणे: १०३ (४)
पुणे मनपा: १८६१ (११५)
पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर: ६ 
सोलापूर मनपा: १६९ (८)
सातारा: ८९ (२)
पुणे मंडळ एकूण: २३५१ (१३२)

कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ४ (१)
रत्नागिरी: १६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (४)

औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३७० (११)
जालना: ८
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४४१ (१२)

लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३ 
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)

अकोला: ८ (१)
अकोला मनपा: ७५ (८)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ६९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २७६ (२०)

नागपूर: २
नागपूर मनपा: १८० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८८ (२)

इतर राज्ये: ३२ (६)