कोरोनाचा संसर्ग : पुणे जिल्ह्याबाबात अजित पवार यांचा मोठा निर्णय

Ajit Pawar on Corona Update :राज्यात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र, पुण्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.  

Updated: Jan 22, 2022, 03:50 PM IST
कोरोनाचा संसर्ग : पुणे जिल्ह्याबाबात अजित पवार यांचा मोठा निर्णय  title=

पुणे :  Ajit Pawar on Corona Update :राज्यात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती आटोक्यात आहे. मात्र, पुण्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी कोरोना  परिस्थिती आढावा घेतल्यानंतर शाळा आणखी एक आठवडा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात कोरोना अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णसख्या 71 हजारांच्या घरात पोहोचली आहे. (Corona infection increased: Ajit Pawar's big decision regarding Pune district) 

पुणे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. वाढलेली कोरोना संख्या अजून 8 दिवस खाली येणार नाही. तसेच पुण्याचा पॉझिटिव्ह रेट हा 27 टक्के आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता पुण्यातील शाळा किमान एक आठवडा सुरु करायच्या नाहीत असा निर्णय घेतला आहे. तसेच शाळा प्रमाणे कॉलेजेस ही एक आठवडा सुरु करणार नाही.  पुढील आठवड्यात परिस्थीत बघून पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. काही रुग्णालायमध्ये कोविड रुग्णांना दाखल करून घेतलं जातं नाही, अशा तक्रारी होत्या. अशा हॉस्पिटल्सशी बोलणे झाले आहे. त्यांनी एका पेक्षा जास्त शाखा असतील तर एक ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

 खेळाडूंना स्विमिंग पुल तसेच मैदाने खुली करण्याचा निर्णय झाला झाला आहे. सिंहगड, लोणावळा या ठिकाणची दुकाने,  स्टॉल्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अष्टविनायक तसेच भीमाशंकर भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.  ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी शनिवार, रविवार राखून ठेवायाचा आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळं खुली करणार आहोत. परंतु गर्दी वाढली तर निर्बंध आणले जाऊ शकतात, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला. त्याचवेळी ते म्हणाले, दोन डोस घ्या, जीव वाचवा. जबरदस्ती करुन चालणार नाही. नाहीतर लोकांना 75 च्या नसबंदी सारखे वाटेल.