दाऊद गँगच्या आणखी एका म्होरक्याला अटक

तारिक परिवीन हा 1993 मध्ये मुंबई झालेल्या स्फोटांप्रकरणात आरोपी होता.

Updated: Apr 27, 2018, 08:32 PM IST
दाऊद गँगच्या आणखी एका म्होरक्याला अटक  title=

ठाणे : कुख्यात अंडरवर्ल्ड म्होरक्या दाऊदचा आणखी विश्वासू साथीदाराला गजाआड करण्यात पोलीसांना यश आलंय. दाऊदचा अत्यंत निकटवर्ती तारीक परवीनला आज ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधीत पथकानं अटक केलीय. आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या नेतृत्वात तारीकला अटक करण्यात आलीय. 

तारिक परिवीन हा 1993 मध्ये मुंबई झालेल्या स्फोटांप्रकरणात आरोपी होता. त्याचप्रमाणे दाऊदच्या सारा सहारा मार्केटसाठी झालेल्या जमीन घोटाळ्यातही त्याचा हात होता. 

मुंब्य्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका खूनाच्या प्रकरणातही तारिक आरोपी होता. याच खूनाच्या प्रकरणात त्याला खंडणी विरोधी पथकानं अटक केलीय.