राज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता   

Updated: Dec 7, 2020, 08:17 AM IST
राज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ title=

मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु झालेला हिवाळ्याचा ऋतू आता खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशात स्थिरावू लागल्याचं चित्र आहे. उत्तर भारतात सातत्यानं तापमानाचा पारा खाली जात असून, दिल्लीपासून अगदी Jammu kashmir जम्मू काश्मीरपर्यंत याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीत तापमानाचा आकडा 12 अंशांखाली उतरल्याचं निरिक्षात आढळून आलं. उत्तरेकडील कोरड्या आणि थंड वाऱ्यांमुळं जम्मू काश्मीर, himachal हिमाचल आणि uttarakhand उत्तराखंडमधील काही उंच प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. 

दरम्यान, देशाच्या उत्तरेकडे आलेली ही थंडीची लाट राज्यावरही परिणाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात pune पुणे, nashik नाशिक, satara सातारा, nagpur नागपूर, kolhapur कोल्हापूर या भागांसह Mumbai मुंबईतही तापमानाचा आकडा खाली गेल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात 11.5 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, महाबळेश्वरमध्ये 14.3 अंश सेल्शिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं.

 

थंडीची मजा घेण्यासाठी गिरिस्थानांवर गर्दी 

राजच्यात आलेली ही थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर आणि coronavirus कोरोना काळातील unlock अनलॉकच्या या टप्प्यात आता थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा या भागांमध्ये अनेक ठिकाणी शहराकडून जाणारी गर्दी वाढल्याचं दिसत आहे. मुख्य म्हणजे कोरोनाचं संकट पाहता या भागांमध्ये शक्य त्या सर्व परिंनी काळजी घेण्यात येत असून, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिक आपली जबाबदारी पार पाडत असल्याचंही पाहायला मिळत आहे.