सांगली : Pandharpur Wari and Warkaris : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला देवासारखे धावून आले आहेत. सांगलीतील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करा, असे निर्देश शिंदेंनी दिले. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 14 वारकरी जखमी झाले.या ची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळतात तातडीने फोन करत उपचार करण्याचे निर्देश दिलेत.
सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करुन गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक वाहन घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आषाढी वारी अगदी दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं होते. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द मुख्यमंत्री धावून आल्याने याचीच जोरदार चर्चा आहे.